मध्यप्रदेश बहुजननामा : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील चुनाभट्टी परिसरातील महिलेने आपल्या पतीवर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलेने आरोप केला आहे कि , माझे पती हे समलैगिंक आहेत. ते तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात . यासंदर्भात तिने माधौगड पोलीस ठाण्यात आपल्या पती अभिनीत गुप्ता विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
अभिजित हा पेशाने डॉक्टर आहे. तो पॉयजन एंटी एजिंग स्किन क्लीनिक चालवतो. त्याचबरोबर तो पब, नकली औषधं , जिम , वेश्या व्यवसाय चालवतो. आपल्या तक्रारीत महिला सांगते कि, डॉ. गुप्ता याने तिच्या मनाविरुद्ध तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. मार्च २०१९ मध्ये महिला आणि आरोपी डॉ. गुप्ता यांनी भोपाळ मध्ये विवाह केला होता. महिलेने दाखल केलेल्या पत्रात तिने लिहिले आहे कि, अभिनित आणि त्याचे कुटुंबीय माझ्याकडे सारखी पैशांची मागणी करत होते, त्यांनी तिला माहेरून २५ लाख रुपये घेऊन आणण्यासाठी दबाव टाकला. तसेच तिच्याकडून वारंवार अनैसर्गिक कृत्य आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले . महिलेने डॉ. गुप्ता सोबतच सासरे, आरोपीची बहीण आणि इतर सदस्यांवर देखील आरोप केले आहेत.
पोलिसांनी म्हंटले आहे कि, महिलेने आरोपीविषयी एफआयआर दाखल केली आहे. त्याला आम्ही लवकरच अटक करू. तक्रार दाखल होताच. गुप्ता याने प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली आहे, त्यांते महिला व तिचे कुटुंब आपल्याकडे सतत पैशाची मागणी करत असतात , त्यामुळे मी मार्च महिन्यात लग्न झाल्यानंतर एका महिन्यातच मी घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती.