Maharashtra Winter Session 2023 | संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय

नागपूर : Maharashtra Winter Session 2023 | आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Winter Session 2023) लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरूणांनी सभागृहात उडी मारली आणि बेंचवरून उड्या मारत सभापतींच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी स्मोक कँडल जाळल्याने सर्वत्र पिवळा धुर पसरला होता. सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आल्याने ही घटना देशभरात चर्चेचा विषय झाली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधानसभेत (Maharashtra Winter Session 2023) देखील उमटले. विधीमंडळातील सुरक्षेसंदर्भात यावेळी अध्यक्षांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आज अधिवेशनात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Leader Prithviraj Chavan) यांनी संसदेत घडलेली घटना सांगितली आणि विधीमंडळातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत म्हटले की, आपणही याबाबत काळजी घ्यायला हवी. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी म्हटले की, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास (Visitors Pass) काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका. (Maharashtra Winter Session 2023)
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधीमंडळाचे पासेस कमी करायला हवेत. यावर अध्यक्षांनी म्हटले की, मी जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही.
- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड
- बिलाच्या पावत्या एडीट करून पैशांचा अपहार, वायसीएम हॉस्पिटलमधील प्रकार
- लाच स्वीकारताना नगरपरिषदेचे मुख्यअधिकरी व विद्युत पर्यवेक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
- खडकी अॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनच्या झाडाची चोरी, दोघांना अटक
- मित्रांसोबत फिरायला गेला अन् गमावला जीव, मुळशीतील प्लस व्हॅलीच्या 1200 फूट खोल दरीत तरुण पर्यटकाचा मृत्यू
Comments are closed.