Maharashtra Politics News | उध्दवजी अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा शांतपणे विचार करा; ठाकरेंना सभागृहातच ऑफर

Maharashtra Politics News | uddhav thackeray we still have time think about it bjp leader sudhir mungantiwar offer to uddhav after meeting with devendra fadnavis Maharashtra Politics

बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कलूषित झाले असताना गुरूवारी विधानभवनाच्या आवारात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्रित एंट्री करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर सभागृहात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ‘उध्दवजी अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा शांतपणे विचार करा’ असे म्हणून जणू ठाकरेंना परत येण्याची सादच घातली. या दोन्ही प्रसंगांमुळे चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणातील सत्ता संघर्षाने वातावरण कलूषित केले आहे. एकेकाळचे मित्र आता कट्‌टर विरोधक बनले आहेत. त्यातूनच ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. गुरूवारी मात्र चित्र वेगळे दिसले. विधानभवन परिसरात देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्रितपणे एंट्री केली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एवढेच नाही तर दोघेही हसत खेळत गप्पा मारताना ही दिसले. त्यामुळे चर्चांनी जोर पकडला. तसेच इथून पुढे राज्याच्या राजकारणाची काय गणिते असतील असा प्रश्न सर्वांना पडला.

 

त्यानंतर सभागृहात सुधीर मुनगंटीवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी झाली ज्यात ठाकरे यांनी मुनगंटीवार यांनी म्हटले की, वृक्षसंवधर्न मोहिमेतंर्गत तुम्ही लावलेल्या झाडांना फळं आलीच नाहीत.
त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी म्हटले की, झाडांना फळं येतील असं आम्ही तुम्हाला वारंवार भेटून
सांगत होतो. पण तुम्ही झाडांशी नातं तोडलं, त्याला आम्ही काय करणार? या विषयावर टोलेबाजी सुरू असतानाच मुनगंटीवार म्हणाले की, उध्दवजी अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा शांतपणे विचार करा. असे बोलून मुनगंटीवार यांनी ठाकरे यांना पुन्हा एकत्र येण्याची साद घातली आहे. (Maharashtra Politics News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आमची भेट केवळ योगायोग

फडणवीसांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, आमची भेट केवळ योगायोग होता.
आधी खुलेपणा होता. पण आता बंद दाराआड देखील चर्चा फलदायी होतात.
कधी तरी आमची बंद दारा आड चर्चा झाली तर तेव्हा बोलू.
आज आम्ही दोघे एकत्र प्रवेश द्वारातून येताना एकमेकांना राम राम म्हणतात तसं ते झालं.

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | uddhav thackeray we still have time think about it bjp leader sudhir mungantiwar offer to uddhav after meeting with devendra fadnavis Maharashtra Politics

 

हे देखील वाचा :

MLA Ashish Shelar | ‘तुमच्यात हिंमत असेल तर…’, आशिष शेलारांचं सभागृहात बाळासाहेब थोरातांना आव्हान (व्हिडिओ)

WhatsApp Feature | WhatsApp वर नवीन फिचर, वाढणार ग्रुप Admin ची पॉवर; मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

Pune News | गौतमी पाटीलची क्रेझ…तरीही तमाशालाच मायबाप प्रेक्षकांची पसंती

Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी