मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | भाजपशी (BJP) हातमिळवणी करा अन्यथा आम्हाला तुरुंगात टाकतील असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच ‘योद्धा कर्मयोगी, एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे लेखक प्राध्यापक प्रदीप ढवळ (Author Professor Pradeep Dhawal) यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. भाजप-शिवसेनेची 2014 साली युती (BJP-Shiv Sena Alliance) तुटल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज (Maharashtra Politics News) होते, नॉट रीचेबल झाले होते. पण नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते परत आले असे प्रा. ढवळ यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘योद्धा कर्मयोगी, एकनाथ संभाजी शिंदे’ (Yoddha Karma Yogi, Eknath Sambhaji Shinde) हे प्रा. ढवळ यांचे पुस्तक येत्या 18 एप्रिलला प्रकाशित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने प्रा. ढवळ यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी प्रा. ढवळ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या पुस्तकात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापर्यंतचा प्रवास आणि फोटो प्रकाशित केले जाणार आहेत. (Maharashtra Politics News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाचे अजूनही छोटे-मोठे गौप्यस्फोट होत आहेत. त्यातच प्रा. ढवळ यांनी देखील एक गौप्यस्फोट केला आहे. 2014 साली युती तुटली तेव्हाच एकनाथ शिंदे यांना ते आवडले नसल्याने शिंदे नॉट रीचेबल झाले आणि थेट माझ्या गावी आले. तिथेच राहिले. त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता होती. मात्र त्याळी रात्री उद्धव ठाकरेंचा एक कॉल आला, आणि शिंदे यांनी संयम पाळला, असे ढवळ यांनी सांगितले.
तसेच हे पुस्तक शरद पवार (Sharad Pawar) यांनी तीन दिवसांत वाचले आणि काही सूचना केल्या आहेत आणि प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पवार प्रचंड उत्सुक असल्याचे ढवळ यांनी सांगितले. या पुस्तकाचे ठाण्यात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan), पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (Madhu Mangesh Karnik), पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Politics News | shivsena eknath shinde was in rebellion mode in 2014 for bjp uddhav thackeray called
हे देखील वाचा :
Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान