Maharashtra Politics News | मविआच्या बैठकीत शरद पवारांची मोठी खुर्ची अन् उद्धव ठाकरे…, भाजपने पुन्हा ठाकरे गटाला डिवचलं (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | bjp strongly criticizes uddhav thackeray

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | भाजप नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई भाजपच्या (Mumbai BJP) बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना मोठी खुर्ची होती, तर उद्धव ठाकरे मात्र सोप्यावर बसलेले होते, असा टोला आशिष शेलार (Maharashtra Politics News) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना देखील इशारा दिला.

यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना म्हणाले, मविआच्या बैठकीत शरद पवार यांची मोठी खुर्ची होती, तर उद्धव ठाकरे मात्र सोप्यावर बसलेले होते. तेव्हा मला ते गाणं आठवलं ‘कोण होतास तू काय झालास तू’ आमच्यासोबत होतात तेव्हा शिवतीर्थावर तुमची सभा (Maharashtra Politics News) गाजायची. आमच्यासोबत होता तेव्हा तुमच्या घरी सर्व नेते यायचे अन् आज तुम्हाला दारोदार जावं लागतं, अशा शब्दात शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

 

 

शेलार पुढे म्हणाले, मुंबईतील मतदारांनी उद्धवजींच्या नेतृत्व अनेकवेळा नाकारलं आहे. आम्ही तुम्हाला हिंदुत्वामुळे पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेत (Bruhan Mumbai Corporation (BMC) अनेकवेळा शिवसेनेची (Shivsena) घसरण झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई पालिकेत 50 चा आकडाही पूर्ण करणार नाही.

राज ठाकरेंना इशारा

आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले,
राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोललं पाहिजे असं नाही.
तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे. पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.
आम्ही धरसोड करणारे नाहीत, मोदी करतात ते प्रामाणिकपणे करतात, असा टोला शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title : Maharashtra Politics News | bjp strongly criticizes uddhav thackeray