नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Political News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसमध्ये (Congress) कोणी राहण्यास तयार नाही, अख्खा काँग्रेस पक्ष हळूहळू आपल्या पाठिशी येतोय. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तोडफोडीचे राजकारण (Maharashtra Political News) देवेंद्र फडणवीसांनी थांबवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘डबल इंजिन’चे सरकार असल्याचे सांगतात. मग, राज्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) का करत आहे? हे देखील सांगावे. गेल्या एक महिन्यात शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असल्याची घणाघाती टीका पटोले यांनी केली.
फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा…
नैसर्गिक आपत्तीचे (Natural Disaster) संकट शेतकऱ्यावर आले आहे. मात्र शेतकऱ्यांचा कापूस अद्याप खरेदी केला नाही. हरभरा, मका, तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. बेरोजगार आणि गरिबांचे बेहाल सुरु असून, महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा सत्तेचा लोकांना फायदा मिळवून द्या. फोडाफोडीच्या राजकारणात (Maharashtra Political News) त्यांना काहीच मिळणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
फोडाफोडीचे राजकारण थांबवा
महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) तीन तोंड आहेत. सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) दुपारी अजित पवार (Ajit Pawar) आणि रात्री नाना पटोले बोलतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या प्रश्नावर पटोले म्हणाले, फडणवीसांना विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या हातातील सत्तेचा उपयोग स्वत: आणि बगलबच्चांसाठी चाललेला आहे. मंत्रालयात तिजोरी लुटली जात आहे, हे फडणवीसांनी पाहावे. तसेच तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावं, असं आवाहन नाना पटोले यांनी केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Political News | congress nana patole replied bjp dcm devendra fadnavis statement over mahavikas aghadi vajramuth sabha
हे देखील वाचा :