Maharashtra Political News | ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले-‘उद्धव ठाकरे…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपसोबत (BJP) जाण्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Political News) ढवळून निघालं. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर स्वत: अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व दावे फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीतच (Maharashtra Political News) असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता भाजपने अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, मराठीत एक म्हण आहे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ सध्या संजय राऊत नेमकीच तीच भूमिका करताना दिसत आहेत. असंगाशी संग करत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना स्वत:च्याच पक्षापासून बेदखल केलं. आता त्यांची नजर महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर पडलेली दिसते. म्हणूनच अजित पवार यांच्या संदर्भातील पहिले विधान त्यांनी केले होते.
मराठीत एक म्हण आहे #कुऱ्हाडीचा_दांडा_गोतास_काळ
सध्या @rautsanjay61 नेमकीच तीच भूमिका करताना दिसत आहेत.
असंगाशी संग करत त्यांनी @OfficeofUT यांना स्वताच्याच पक्षापासून बेदखल केले
आता त्यांची नजर महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर पडलेली दिसते म्हणूनच @AjitPawarSpeaks यांच्या…— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 19, 2023
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले, माझ्याबद्दलच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं जात आहे. एवढं का प्रेम ऊतू चाललं आहे? माझ्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम विघ्नसंतोषी लोक करत आहेत. माझ्या पक्षातले लोक नाही, पण पक्षा बाहेरचे लोक करत आहेत.
आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचे कारण नाही
इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना घेतला होता. ते म्हणाले, इतर पक्षाचे प्रवक्तेसुद्धा (Spokesperson) राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) फटकारलं होतं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Political News | bjp keshav upadhye criticize sanjay raut mention ajit pawar uddhav thackeray
हे देखील वाचा :
Comments are closed.