Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सायबर पोलिस स्टेशन – फेसबुक फ्रेंडच्या नावाने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

Pune Crime News | Pune-Somwar Peth Crime News : Samarth Police Station - Fraud of 81 lakh 50 thousand FIR On Dnyaneshwar Laxman Ghadge of Incomeroute – Investment & Fianancial Services

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | फेसबुक फ्रेंडची ओळख सांगून एकाने संपर्क करुन फर्निचर स्वस्तात विकायचे असल्याचे सांगितले. फर्निचर व दुचाकी घेऊन येत असल्याचे सांगून महिलेला ८५ हजार रुपयांना गंडा घातला. फेसबुक फ्रेंडने आपले फेसबुक हॅक झाल्याचे सांगून अशा कोणाला ओळखत नसल्याचे सांगितल्यावर महिलेला आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आले. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत वडगाव बुद्रुक येथे राहणार्‍या एका ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या लोणीकंद येथे सामाजिक काम करीत असताना त्यांची प्रताप मानकर यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याशी फेसबुक फ्रेंड (Facebook Friend) आहे. त्यांच्यात व्हॉट्सॲपवर मेसेज (WhatsApp Message) येत होते. त्यांना एके दिवशी अचानक प्रताप मानकर यांची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आली. संबंधिताने मोबाईल क्रमांक मागवून घेतला. त्यानंतर त्याने आपण प्रताप मानकर यांचा मित्र अशिषकुमार असून ए सी आर पी एफचा जवान आहे. त्याची जम्मूला बदली झाली असून घरातील फर्निचर विक्री करायचे असल्याचे व ते खूप स्वस्तात देत आहेत, असे सांगितले. फिर्यादी यांनी मानकर सरांना फोन करु का असा मेसेसद्वारे विचारल्यावर मी कामात व्यस्त आहेत.

 

मी कामातून रिकामा झालो की फोन करतो. तो माझ्या मित्र तुला व्हॉट्सॲपवर संपर्क करेल, असा मेसेज केला. काही मिनिटांनंतर त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. त्यांनी फर्निचरचे फोटो टाकले. त्यांना फर्निचर पसंत पडले. तेव्हा त्याने सामान घेऊन ट्रक पाठवितो. ८५ हजार रुपये पाठवा, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून मानकर यांच्याशी संपर्क न करता व माल आला नसतानाही त्यांनी संबंधितांना ८५ हजार रुपये पाठविले. अशिषकुमार याने पाठविलेल्या फर्निचर व स्कुटीची वाट पाहत होते. परंतु, सामान काही आले नाही. दुसर्‍या दिवशी मानकर यांना फोन करुन या प्रकाराची माहिती दिल्यावर त्यांनी आपले फेसबुक हॅक  झाल्याचे तसेच कोणत्याही आशिषकुमार याला ओळखत नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Cyber Police Station – Woman cheated in the name of selling furniture in the name of Facebook friend

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दत्तवाडी पोलिस स्टेशन – मित्र पळून गेल्याने टोळक्याने युवकांवर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune News | पुणे न्यूज : संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिका : आठवड्याभरामध्ये 700 बदल्या ! मनपामध्ये अभियंत्यापाठोपाठ अधीक्षक व लिपिकांच्या बदल्या; शिक्षण मंडळाच्या लिपिकांची प्रथमच वॉर्ड ऑफीसमध्ये बदली