काय आहे प्रकरण?
तक्रारदार कुरुळकर यांनी केलेल्या आरोपानुसार, घुसखोर बांग्लादेशी महिला (Bangladeshi Woman) आरोपी रेश्मा खान (Reshma Khan) हिने अनधिकृतपणे व योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करुन इतर साथीदारांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे (Fake documents) तयार करुन भारताचा पासपोर्ट तयार केला. याप्रकरणी कुरुळकर यांनी तक्रार देऊनही आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त असलेले दीपक फटांगरे (ACP Deepak Phatangare) आणि तत्कालीन सहपोलीस आयुक्त Joint CP (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव आल्याचा आरोप केला आहे. (Maharashtra Police)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (Criminal Intelligence Unit) चे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे (Police Inspector Milind Kathe) यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1436/2021 हा भारतीय दंडविधान संहिता कलम 465,467,468,471,420 आणि 34 तसेच कलम 12 (1-अ) (ब) भारतीय पारपत्र अधिनियम 1967 सह नियम क्रमांक 3,6 पारपत्र (भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) 1950, सह कलम 3 परिपत्रकान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम 1920 सह कलम 3(1) विदेशी नागरीक याबाबतचा अध्यादेश 1948 सह कलम 13,14(अ) आणि (ब) विदेशी नागरीकाबाबत अधिनियम 1946 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सीआयु (CIU) करीत आहे.
Web Title :- Maharashtra Police | threat from ips deven bharti for me and my family provide police protection Retired Police Inspector Deepak Kurulkar
MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा