Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील 10 पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/ उप अधीक्षक पदावर पदोन्नती

Maharashtra Police Officer Transfer | Promotion of 10 police inspectors in the state to the post of Assistant Commissioner of Police/ Deputy Superintendent

मुंबई : हुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील 10 पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) तात्पुरत्या स्वरुवात उप अधीक्षक (DySP)/सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती देऊन त्यांची पदस्थापना (Maharashtra Police Officer Transfer) केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे (Promotion) आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल गोपाल बोरसे (Under Secretary Swapnil Gopal Borse) यांनी गुरुवारी (दि.10) काढले आहेत.

ही पदोन्नती सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्याय निर्णय व आदेश यांच्या आधीन राहून देण्यात आली आहे. तसेच पदोन्नती तात्पुरत्या (Maharashtra Police Officer Transfer) स्वरुपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकारी यांना नियमाधीनतेचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क असणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात पदोन्नतीने पदस्थापना

1. राजेंद्र गणपत सांगळे Rajendra Ganpat Sangle (अपर पोलीस अधीक्षक Addl SP (ए.ट.प). लाचुलचपत प्रतिबंधक विभाग मुंबई-ACB Mumbai)
2. चंद्रकांत कृष्णा निरावडे Chandrakant Krishna Nirawade (पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे- Dysp Caste Certificate Verification Committee, Pune)
3. अजय तानाजी वसावे Ajay Tanaji Vasave (पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), नाशिक ग्रामीण- DySP Nashik Rural)
4. प्रमोद केशवराव मकेश्वर Pramod Keshavrao Makeshwar (उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा उप विभाग)
5. सुवर्णा प्रसाद पत्की-कवळेकर Suvarna Prasad Patki-Kawlekar (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर)
6. सुधीर भीमसिंग पाटील Sudhir Bhim Singh Patil (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर-ACP Amravati City)
7. सुरेश तुकाराम शिंदे Suresh Tukaram Shinde (सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)
8. रामकृष्ण नामदेवराव मळघणे Ramakrishna Namdevrao Malaghane (उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट उप विभाग, जि. नांदेड)
9. दादा हरी केशवराव चौरे Dada Hari Keshavrao Chaure (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई-Brihanmumbai)
10. गणपत हरीचंद्र दराडे Ganpat Harichandra Darade (उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उप विभाग, जि. जालना)

याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त दीपक विठ्ठलराव गिऱ्हे (DCP Deepak Vitthalrao Girhe) यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक येथे बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

 

Web Title : Maharashtra Police Officer Transfer | Promotion of 10 police inspectors in the state to the post of Assistant Commissioner of Police/ Deputy Superintendent