मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणाचा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) करत आहे. अनेकांडे एनआयएने चौकशी केली असून त्यांचे जबाबही नोंदवले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनाही १३ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्या सोबत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सचिन वाझेना अटक. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे,” असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.
व्हिडिओमध्ये सोमय्यांनी म्हंटले आहे की, सचिन वाझेंना अटक झाली. पण त्याना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल. सचिन वाझेंसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय सांगणार आहेत असं सवाल उपस्थित करत अजून तर काय काय बाहेर येणार? तेही पाहायला हवे.
तत्पूर्वी वाझेंनी अटकपूर्व जामिनासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १९ मार्चला सुनावणी होणार होती. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी आणि ४ (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
एटीएसकडून वाझेंची तब्बल दहा तास चौकशी
अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर आढळलेल्या स्फोटके असलेली स्कॉर्पिओ कारचा तपास सचिन वाझे करत होते तपासादरम्यान कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले. हिरेन कुटूंबियांनी वाझेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपने त्यांना निलंबित करून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकाच्या आक्रमक पवित्र्यानंतर गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. त्यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली. त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली. यावर वाझे यांनी प्रतिक्रिया देताना, मी क्राईम ब्रँचच्या सेवेतून मुक्त झालो, असे सांगत अधिक बोलणे टाळले होते.