बहुजननामा ऑनलाइन टीम – काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपाचे सरकार कोसळले. त्यामुळे महाविकासआघीडेचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज सकाळी विधान भवन परिसरात सुप्रिया सुळे नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. अजित पवार विधान भवनात दाखल होताच सुप्रिया यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतले. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी काल शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
विधान भवनात नवनिर्वातिच आमदारांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे अचानक तेथून बाहेर पडल्यामुळे आता हा चर्चेचा विषय बनला आहे. सकाळपासून विधानभवनामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांनी अजित पवार, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदेंचं विधान भवनात स्वागत केलं. मात्र त्यांना अचानक फोन आला आणि त्या धावत बाहेर आल्या. सुप्रिया सुळे यांना कोणाचा फोन आला ज्यामुळे त्यांनी थेट धाव घेतली असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याचबरोबर यावर चर्चा देखील सुरु झाली आहे.
कुटुंबासोबत फोटो काढताना सुप्रिया सुळेंना अचानक फोन आला आणि त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दूर सारत निघून गेल्या. ते अचानक निघून गेल्यामुळे त्यांना नेमका कोणाचा फोन आला असेल ज्यामुळे त्या धावत विधानभवनातून बाहेर पडल्या अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली आहे.
Visit : bahujannama.com