सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion । महाराष्ट्रात मागच्या विधानसभेत काँग्रेसला (Congress) म्हणावे तसे सदस्य निवडून आणता आले नाहीत. यांनतर काँग्रेस पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होऊन सत्तेत उभा राहिला. तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले. त्यांनतर काँग्रेसच्या वाटे मंत्रिपद आले आणि विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षपद (Speaker of the Assembly) देखील काँग्रेसलाच मिळाले. मात्र, सध्या विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. यासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करण्याच्या हालचाली महाविकास आघाडीत सुरु आहे. मात्र, या रिक्त मंत्रिपदावर माजी मंत्री सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांचं नाव समोर येत आहे. मात्र कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) यावरून काँग्रेसमधील अनेक नेते इच्छुक आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) देखील इच्छुक आहेत.
मात्र, अनेक नेत्यांमध्ये पदाशिवाय जनतेला न्याय देतील असे नेते देखील आहेत. यातच आता आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे.
प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) या सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
त्यावेळी अनेक तेथील दिग्गज विरोधकांचा त्यांनी पराभव केला आहे.
प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्यामुळे त्यांना 2019 च्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती.
मात्र, त्यांना पक्षाने त्यांना महिला कॉंग्रेसचे कार्याध्यक्षपद दिले.
आता प्रणिती शिंदे या मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे समजते.
सध्या असलेल्या काँग्रेसच्या मंत्रिपदापैकी एका मंत्र्याला विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते.
त्याठिकाणी रिक्त असलेल्या पदावर कोणाची निवड करायची हे पाहणे अपेक्षित आहे.
त्यातच रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वत: इच्छुक असतील की आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी ते मंत्रिपद सोडतील, यावर देखील चर्चा होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, नितीन राऊत यांचे नाव आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचे समजते.
या दरम्यान सोलापुरात सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांना काँग्रेस सत्तेच्या काळात मंत्रिपद होते.
युतीच्या काळात देखील सोलापूरकडे मंत्रिपद होते,
आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांना कॅबिनेट तर आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांना राज्यमंत्रिपद दिले.
त्याआधी उत्तमप्रकाश खंदारे (Uttamprakash Khandare) यांनाही मंत्रिपद मिळाले होते.
मात्र, आता प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल का हे पाहणे महत्वाचे आहे.
web title: Maharashtra Cabinet Expansion | MLA Praniti Shinde to get ministerial post?
Pune News | टुव्हीलरवरून एक नाही तर तब्बल 6 जणांचा प्रवास; पोलीस देखील चक्रावले
MLA Madhukar Thakur | माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन