अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – काल महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा सुरु झाली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावा त्यांनी केला. तसेच आता विस्तार झाला नाही तर मग 2024 नंतरच विस्तार (Maharashta Cabinet Expansion) होईल असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बच्चू कडू म्हणाले, माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन 20 किंवा 21 मे पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार हा आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी महत्त्वाचा आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती आहेत. त्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा गरजेचा आहे. आता कोणालाही मंत्री करा, पण मंत्रिमंडळ विस्तार करा. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर तो 2024 नंतरच होईल, असंही बच्चू कडू म्हणाले.
यावेळी बच्चू कडू यांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर भाष्य केलं. काही बाजू सोडल्या तर
न्यायाच्या बाजूने निकाल झाला आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी जे काही केले, कागदपत्र जमा केली,
ज्या पद्धतीने व्यूहरचना आखली, ते सगळं व्यवस्थित होते. त्यामुळे सत्तेच्या बाजूने निकाल लागला. विरोधी पक्षाकडून काही चुका झाल्या. पण जनतेला काम करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे लोक खुश असल्याचे कडू यांनी म्हटले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं.
परंतु शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकदाच झाला. त्यामुळे पहिल्या विस्तारामध्ये स्थान
न मिळालेल्या अनेक नेत्यांना दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी आशा आहे.
त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार 20 किंवा 21 तारखेला होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion MLA bacchu kadu
हे देखील वाचा :