Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’
धाराशिव (उस्मानाबाद) : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra ACB Trap | 5 लाख रूपये किंवा सेंकड हॅन्ड गाडीच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 90 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी धाराशिवच्या (उस्मानाबाद) लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Dharashiv Osmanabad ACB Trap) सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) एका पोलिस कर्मचार्यावर लाच मागितल्याप्रकरणी (Bribe Case) परंडा पोलिस ठाण्यात (Paranda Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra ACB Trap)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भगवान भरत नाईकवाडे Bhagwan Bharat Naikwade (सहाय्यक पोलिस निरीक्षक, परंडा पोलिस स्टेशन, धाराशिव) आणि सागर वसंतराव कांबळे Sagar Vasantrao Kamble (पोलिस शिपाई, बक्कल नं. 50, परंडा पोलिस स्टेशन, धाराशिव) अशी लाचेची मागणी करणार्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान नाईकवाडे हे सन 2019 मध्ये धाराशिव (उस्मानाबाद) येथे दहशतवाद विरोधी पथकात (Anti-Terrorist Squad) कार्यरत होते. त्यांनी वाशी (Washi) येथे पत्याच्या क्लबवर रेड करून तक्रारदार आणि इतरांना आरोपी केले होते. तसेच त्याच दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्हयातील व वाशी येथील इतर जणांविरूध्द कलम 353, 307 चा गुन्हा दाखल केला होता. (Maharashtra ACB Trap)
परंतु कलम 353, 307 च्या गुन्हयामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हेते. दि. 14 एप्रिल 2023 रोजी एपीआय भगवान नाईकवाडे, पोलिस कर्मचारी सागर कांबळे यांनी तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जुगाराच्या गुन्हयात मदत केली आणि कलम 353, 307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून 5 लाख रूपये किंवा सेकंड हॅन्ड गाडीच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 90 हजार रूपये लाच घेण्याचे मान्य केले. दरम्यान, तक्रारदाराने धाराशिवच्या (उस्मानाबाद) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau) तक्रारीची त्याच दिवशी पडताळणी केली. तक्रारदाराने अॅन्टी करप्शनकडे तक्रार केल्याचा संशय एपीआय भगवान नाईकवाडे आणि पोलिस कर्मचारी सागर कांबळे यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच घेतली नाही. त्यामुळे लाच मागणी केल्याप्रकरणी दोघांविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Osmanabad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सिध्दराम म्हेत्रे (DySP Siddram Mhetre) गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक विकास राठोड (Police Inspector Vikas Rathod), पोलिस अंमलदार दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिध्देश्वर तावसकर आणि विशाल डोके यांनी केली आहे.
Web Title :- Maharashtra ACB Trap | Anti-corruption department: 5 lakh bribe demand from assistant police inspector, police personnel ‘under the hood’ with API
हे देखील वाचा :
Dhananjay Munde | Perfectly Well, अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या धनंजय मुडेंचे सूचक विधान
Comments are closed.