Ajit Pawar | कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज, सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका, अजित पवारांनी केली विनंती
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्क गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. आता या गोष्टीचा तुकडा पाडा, कारण नसताना गैरसमज करु देऊ नका. 40 सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमची सहनशिलता संपते, त्याचा अंत होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवार यांनी केली. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आम्ही सर्वजण राष्ट्रवादीतच राहणार आहे. तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. 40 आमदारांच्या (MLA) सह्या घेतलेल्या नाहीत. मला कामासाठी आमदार भेटले. यामधून वेगळा अर्थ काढू नका. मी राष्ट्रवादीमध्ये आहे. हे प्रतिज्ञापत्रावर (Affidavit) लिहून देऊ का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. काळजी करु नका पवार साहेबांच्या (NCP Chief Sharad Pawar) नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादीत अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये यथाकिंचीतही तथ्य नसल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे?
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार अल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पण सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे? असा सवाल त्यांनी केला. विपर्यास करुन बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत जावा. आपापल्या भागात महाविकास आघाडी कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करा असेही अजित पवार यांनी म्हटले.
संजय राऊतांना टोला
इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, इतर पक्षाचे प्रवक्तेसुद्धा (Spokesperson) राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी अजित पवारांनी संताप व्यक्त केला. ट्विटरवरुन कव्हर पेज काढलं याबाबत बोलताना ते म्हणाले की, ट्वीटर पेजला माझं आधी उपमुख्यमंत्री असं पद होतं. तेवढं काढलं, त्यानंतर बाकीचे आहे तसंच आहे.
कार्यक्रमात निष्पाप लोकांचा बळी गेला
आम्ही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेसाठी नागपूरला गेलो होतो. येताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एकाच विमानाने आलो. त्यानंतर नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात
उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आम्ही नवी मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री सदस्यांची भेट घेतली. मुळात या कार्यक्रमात निष्पाप लोकांचा बळी गेला. तो कार्यक्रम दुपारी घेतला असता. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्या कार्यक्रमाला सदस्य हे सकाळी सुद्धा हजर होत असतात. आम्ही सगळ्यांना भेटलो. आम्हाला त्यात कोणतेही राजकारण करायचे नाही. हा कार्य़क्रम राजभवन किंवा बंदिस्त हॉलमध्ये सुद्धा घेता आला असता.
सर्व चर्चांना आता पूर्णविराम द्या
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोन लोक बोलणार असे ठरले आहे. त्यादिवशी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) पण बोलले नाही. त्यांना कोणीही याबाबत विचारले नाही. आम्ही ठरवले होते की नागपूरमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) बोलणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे मी आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोललो.
आता एक मेला मुंबईत सभा होत आहे. त्या सभेत कोण बोलणार ते देखील आम्ही ठरवू असे अजित पवार म्हणाले. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आमचे नेते मजबूत आहेत. चुकीच्या बातम्या दिल्यामुळं मित्रपक्षही नाराज होतात असे पवार म्हणाले. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम द्या, या चर्चा थांबवा असेही अजित पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar live press conference mumbai ncp
हे देखील वाचा :
Comments are closed.