ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – ठाणे परिसरातून एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नव्हे तर त्यानं बलात्कार करून तिचे अश्लील फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल केल्याचं समजलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण प्रीतम साहा असे या आरोपीचं नाव असून तो मूळचा उत्तराखंडातील टिहरी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. व्यवसायानं तो शेफ असून ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगेल यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच आरोपीनं इंग्रजी भाषेची शिकवणी लावली होती. येथेच या पीडित मुलीशी त्याची ओळख झाली.
लग्नाचं आमिष दाखवून त्यानं तिला एका लॉजवर नेलं आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिचे अश्लील फोटो काढले. आणि सोशल मीडियावर वायरल देखील केली आहेत. तसेच पीडितेच्या भाऊ आणि मित्रांना देखील पाठवले होते. यानंतर पीडित तरुणीनं गुरुचरणविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपीला शनिवारी उत्तराखंडातून अटक केली. सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.
Visit : bahujannama.com