बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधान आणि केसेस दाखल होत असल्यानं चर्चेत येणारी बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेत येण्याचं कारण(Maharaj ) कोणताही वाद किंवा केस नाही. अलीकडेच नालागढचे महाराज(Maharaj ) विजदयेंद्र सिंह (Vijayendra Singh) यांनी तिच्यासाठी दावत अरेंज केली होती. याचे फोटो समोर आल्यानंतर कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कंगनाची बहिण आणि मॅनेजर रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिनं या पार्टीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मनालीत कडाक्याची थंडी आहे. याचा नजाराही या फोटोत पहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीत सगळेजण शेकोटीजवळ बसले आहेत. सोबतच सर्वांच्या हातात ड्रिंक दिसत आहे.
कंगनानंही डिनरआधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत कॅप्शनमध्ये कंगना म्हणते, आयुष्यात काहीही झालं तरी एक लक्षात ठेवयाचं. स्टाईलमध्ये रहायचं. कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
दरम्यान ऑक्टोबरमध्ये कंगनावर तुमकुर कर्नाटकात एक आणि मुबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.