Madha Loksabha Election 2024 | मोहिते पाटील ‘तुतारी’ वाजवणार, पाश्चिम महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का!
सोलापूर : Madha Loksabha Election 2024 | अकलुजचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील (Jaysingh Mohite Patil)यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत हा भाजपासाठी पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जात आहे. राजकीय स्थितीचा फायदा घेत शरद पवार यांनी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे.
उद्या विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite-Patil) , जयसिंह मोहिते पाटील तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई भेट घेणार आहेत. तसेच ते उद्याच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनीही उमेदवारी मागितली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला होता. तरीही निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी दिली. यामुळे अकलूजचे मोहिते पाटील नाराज होते. यानंतर आता या घडामोडी होत आहेत.
याबाबत जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले की, मी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी असे चार महिन्यापूर्वीच म्हटले होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपामध्येच राहणार आहेत. आम्ही काल त्यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या पक्षात रहा. आता आम्ही सर्वांनी शरद पवार यांच्या पक्षात जायचे ठरवले आहे.
Pune Loni Kalbhor Crime | पुणे : घरात घुसून मारहाण, हवेत कोयते फिरवून दहशत पसरवणाऱ्या सहा जणांवर FIR
Comments are closed.