नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस कहर सुरू असतानाच ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर ऑक्सीजन लावलेला असतानाही बेडवर बसून थिरकणार्या त्या मुलीची जगण्याने अखेर साथ सोडली. दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधील या मुलीचा व्हिडिओ वायरल झाला होता, तीने आता जगाचा निरोप घेतला आहे. हॉस्पिटलमधूनच एका व्हिडिओद्वारे ’जियो तो हर पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो’चा संदेश देणार्या या मुलीचा गुरुवारी कोरोनाने मृत्यू झाला. याची माहिती त्याच डॉक्टर मोनिका लंगेह यांनी दिली आहे, ज्यांनी या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.
https://twitter.com/drmonika_langeh/status/1392871777739575301
दिल्लीच्या एका हॉस्पिटलच्या डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता, ज्यामध्ये 30 वर्षांची ही मुलगी बेडवर बसूनच ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकताना दिसली होती. परंतु गुरुवारी रात्री त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त डॉ. मोनिका लंगेह यांनी आपल्या ट्विटरवर दिले आणि लिहिले- ’मी खुप दु:खी आहे…आम्ही हा ब्रेव्ह सोल गमावला. प्लीज, कुटुंबासाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करा की त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळावी.
She is just 30yrs old & She didn't get icu bed we managing her in the Covid emergency since last 10days.She is on NIVsupport,received remedesvir,plasmatherapy etc.She is a strong girl with strong will power asked me to play some music & I allowed her.
Lesson:"Never lose the Hope" pic.twitter.com/A3rMU7BjnG— Dr.Monika Langeh (@drmonika_langeh) May 8, 2021
यापूर्वी व्हिडिओ शेयर करताना डॉ. मोनिका लंगेह यांनी माहिती दिली होती की, मृत मुलगी अवघी 30 वर्षांची होती. तिची प्रकृती गंभीर होती, परंतु आयसीयु मिळाला नाही तेव्हा कोविड इमर्जनसीमध्येच उपचार सुरू केले. मागील 10 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते आणि एनआयव्ही सपोर्टवर होती. तिला रेमडेसिविर सुद्धा दिले, प्लाझ्मा थेरेपी सुद्धा झाली. मुलीची इच्छाशक्ती प्रचंड मजबूत होती.