1. ओठांवर बदामाचे तेल लावणे
बदामाचे तेल फाटलेल्या ओठांपासून आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर बदामाचे तेल लावा आणि काही वेळ ओठांना मसाज करा. यामुळे ओठांना ओलावा मिळेल तसेच त्वचा मुलायम आणि गुलाबी होईल.
2. खोबरेल तेल वापरणे
दिवसातून दोन ते तीन वेळा ओठांवर खोबरेल तेल लावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वीही याचा वापर ओठांवर करा. यामुळे त्वचा मुलायम होईल आणि ओठांच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. हळद लावणे
ओठातून रक्त येत असल्यास तुम्ही हळद वापरू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाव चमचा दुधात दोन चिमूट हळद मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठांचे भेगाही भरतात,आणि त्वचाही मुलायम आणि गुलाबी होते.
4. मध लावणे
ओठांवर मध लावल्याने ओठ फाटण्याची समस्या सहज दूर होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मधाने मसाज करा. याने ओठांच्या भेगा भरण्यास सुरुवात होईल, ओठ मऊ होतील, तसेच वेदनांचा त्रासही कमी होईल. (Lip Care In Winter)
5. साखरेसोबत मध ओठांवर लावणे
ओठांवरून बाहेर पडणारी डेड स्किन (Dead skin) काढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यासाठी दोन चिमूटभर साखरेत दोन थेंब मध मिसळून ओठांवर स्क्रब (Scrub) म्हणून वापरा. यामुळे फाटलेले ओठ ठीक होतील, तसेच ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
6. ओठांवर क्रीम लावा
फाटलेले ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी क्रीम देखील खूप प्रभावी आहे. यासाठी झोपण्यापूर्वी ओठांवर क्रीम लावून दोन-तीन मिनिटे ओठांना मसाज करा. ह्या पर्यायाने फाटलेले ओठ सुंदर, मऊ आणि गुलाबी होतील.
ह्या काही सध्या सोप्प्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही तुमच्या ओठांची सुंदरता सहज वाढवू शकता.
Web Title :- Lip Care In Winter | lips care in winter how to get rid of cracked lip problem with home remedies