नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Certificate | जर तुमची पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. 1 नोव्हेंबरपासून SBI एक नवीन सुविधा सुरु करत आहे. ज्यानंतर पेन्शनर्सला (Pensioners) जीवन प्रमाणपत्र (Jeevan Praman Patra) जमा करण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. बँकेकडून ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कुणीही पेन्शनधारक 1 नोव्हेंबरपासून व्हिडिओ कॉलद्वारे आपले जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेवूयात…
ही आहे संपूर्ण प्रक्रिया –
1. सर्वप्रथम https://www.pensionseva.sbi/ वर जा.
2. यानंतर Video LC वर क्लिक करा.
3. आता एसबीआय पेन्शन खाते क्रमांक लिहा.
4. यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
5. सर्व टर्म अँड कंडीशन्स लक्षपूर्वक वाचा आणि नंतर Start Journey वर क्लिक करा.
6. नंतर पॅन कार्ड जवळ ठेवा आणि I am Ready वर क्लिक करा.
7. यानंतर व्हिडिओ कॉल सुरू करण्याची परवानगी द्या.
8. SBI अधिकार्याच्या उपलब्धतेनुसार तुमचा व्हिडिओ कॉल सुरू होईल. याशिवाय सुविधेनुसार वेळेची निवड करू शकता.
9. व्हिडिओ कॉल सुरू झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले चार डिजिट नंबर वाचायला सांगेल.
10. पॅन कार्ड दाखवावे लागेल ज्याचा अधिकारी फोटो घेऊ शकेल.
11. यानंतर तुमचा सुद्धा एक फोटो घेतला जाईल. नंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
12. जर ही प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर व्हिडिओ कॉलद्वारे माहिती दिली जाईल. अशावेळी पेन्शनधारकाला बँकेच्या शाखेत जाऊन जीवनप्रमाणत्र द्यावे लागेल. जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. (Life Certificate)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Life Certificate | your pension comes in sbi submit life certificate through video call sitting at home.
Chandrakant Patil | ‘मला आमदारकी नितीन गडकरींमुळे मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाहांमुळं’