बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC Policy) आपली एक अतिशय प्रसिद्ध विमा पॉलिसी जीवन अक्षय पॉलिसी बंद केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ती सुरू करण्यात येत आहे. एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी(LIC Policy) अंतर्गत पॉलिसीधारकाला केवळ एकदाच हप्ता भरल्यानंतर आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेण्याची संधी मिळते.
कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही
जीवन अक्षय पॉलिसी सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी प्लॅन आहे. यामध्ये कमीतकमी 1,00,000 रुपयांची गुंतवणुक करून पॉलिसी करू शकता. या पॉलिसीमध्ये कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
जर एखाद्या व्यक्तीने या पॉलिसीत कमीतकमी एक लाख रुपये गुंतवले तर त्यास 12,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. यात पॉलिसीधारक आपल्या इच्छेप्रमाणे कितीही गुंतवणूक करू शकतो. पेन्शनची रक्कम गुंतवणुकीच्या रक्कमेवर आधारीत असेल.
काय आहे पात्रता?
ही पॉलिसी 35 वर्ष ते 85 वर्षांच्या वयाचे लोक घेऊ शकतात. याशिवाय दिव्यांग व्यक्तीसुद्धा या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. या पॉलिसीत पेन्शन रक्कम कशाप्रकारे प्राप्त करायची आहे, यासाठी सुद्धा 10 पर्याय दिले जातात.
कशी मिळेल प्रत्येक महिन्याला 36 हजार रूपयांची पेन्शन?
जीवन अक्षय पॉलिसीचा Annuity payable for life at a uniform rate पर्याय निवडून या पॉलिसीत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला 36 हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकता. उदाहरणार्थ जर कुणी 45 वर्षांचा व्यक्ती हा प्लॅन निवडत असेल आणि सोबतच 70,00,000 रूपयांचा सम अॅश्युअर्ड पर्याय निवडला तर त्यास 71,26,000 रुपयांच्या प्रीमियमची एकरकमी पैसे भरावे लागतील. या गुंतवणुकीनंतर त्यास दरमहा 36,429 रूपयांची पेन्शन मिळेल. मात्र, मृत्युनंतर ही पेन्शन बंद होईल. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये अशाप्रकारचे अनेक प्लॅन आहे.