नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना उपलब्ध करून देत असते. LIC ने नुकतीच एलआयसी न्यू मनी बॅक स्कीम (२५ वर्षे) लाँच केली आहे. हि एक नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, जी गॅरंटीड रिटर्न्स आणि बोनस देते. या योजनेत आपणास केवळ २० वर्षांचे प्रीमियम द्यावे लागेल, तर आपले पॉलिसी २५ वर्षे चालू असेल. ही योजना १३ ते ४५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती २५ वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी घेऊ शकते. याअंतर्गत, पॉलिसीधारक जीवित असेपर्यंत, विम्याच्या रकमेपैकी १५ टक्के रक्कम प्रत्येक ५ वर्षाच्या शेवटी दिली जाते, आणि उर्वरित रकमेच्या ४० टक्के रक्कम योजनेच्या शेवटी (मॅच्युरिटी बेनिफिटच्या रूपात) दिली जाईल.
महत्वाचे :
LIC ची नवीन मनी बॅक स्कीमची वैशिष्ट्ये (२५ वर्षे):
१) वर्षांच्या कालावधीसाठी मनी बॅक प्लॅन.
२) विमा राशीच्या १५ टक्के रक्कम पॉलिसीधारकाला प्रत्येक ५ व्या, १० व्या, १५ व्या आणि २० व्या वर्षाच्या अखेरीस सर्व्हायवल बेनिफिट म्हणून दिले जाते.
३) विमाराशीच्या ४० टक्के रक्कम पॉलिसीधारकास योजनेच्या शेवटी, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनससह दिले जाते.
४) याअंतर्गत LIC अपघात मृत्यू आणि अपंगत्व लाभ राइडर एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसीअंतर्गत दिले जाणारे फायदे (२५ वर्षे)
डेथ बेनिफिटः पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला मृत्यू बेनिफिट म्हणून “सम अॅश्युअर्ड ऑन डेथ” सोबत सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस दिले जाते. ज्यात मूलभूत रकमेच्या १२५ टक्के, वार्षिक प्रीमियमच्या १० पट, मृत्यूच्या रकमेची विमा रक्कम भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या किमान १०५ टक्के असेल.
सर्व्हायव्हल बेनिफिटः
-५ व्या वर्षाच्या अखेरीस विम्याच्या १५ टक्के रक्कम
– १० व्या वर्षाच्या अखेरीस रकमेच्या १५ रक्कम
– १५ व्या वर्षाच्या अखेरीस विम्याच्या १५ टक्के रक्कम
– २० व्या वर्षाच्या शेवटी, विमा राशीच्या १५ टक्के रक्कम
– ही योजना २५ वर्षांच्या पॉलिसीची मुदत संपेपर्यंत चालू राहील.
पॉलिसीधारक संपूर्ण पॉलिसी मुदतीसाठी म्हणजेच २५ वर्ष टिकून राहिल्यास त्याला खालील फायदे मिळतील. उर्वरित विम्याची रक्कम (४० टक्के ) + प्राप्त प्रत्यावर्ती बोनस + अंतिम एडिसन बोनस (असल्यास) सध्याच्या प्राप्तिकर कलम ८० सी च्या नियमांनुसार, जीवन विम्यात अंतर्गत जास्तीत जास्त प्रीमियम रू. १, ५०,००० ची सूट देण्यात आली आहे. प्राप्त रक्कम आयकर कलम १० (१०) डी अंतर्गत करमुक्त देखील आहे.
जर आपल्या पॉलिसीला सरेंडर व्हॅल्यू मिळाला असेल तर आपण या योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा घेऊ शकता. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज दर वेळोवेळी बदलत असतात आणि आपल्याला एलआयसीच्या जवळच्या कार्यालयात जावे लागेल आणि वेळोवेळी ते मिळवावे लागेल. तसेच पॉलिसीच्या कालावधीत कोणत्याही वेळी अतिरिक्त नाममात्र प्रीमियम देवून, त्याअंतर्गत प्रदान करण्यात येणारी अतिरिक्त रक्कम (कव्हर) निवडून आपण या रायडरचा लाभ घेऊ शकता. या कव्हरला अपघात लाभ सम अॅश्युअर्ड असे म्हणतात.
अपघाती मृत्यूच्या बाबतीत, मृत्यूच्या लाभाबरोबरच ‘अपघाती लाभ सम अॅश्युअर्ड’ देखील नामनिर्देशित व्यक्तीला दिले जाते. कोणत्याही अपघाताच्या १८० दिवसात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, पॉलिसी धारकास दहा वर्षांच्या कालावधीसाठी समान मासिक हप्त्यांमध्ये अॅक्सिडेंट बेनिफिट विमा रकम दिली जाईल. या रायडरचा भविष्यातील प्रीमियम देखील माफ केला जाईल. या व्यतिरिक्त, मूळ प्रीमियमपेक्षा अपघात लाभ समान रक्कमेची समान रक्कम कमी केली जाईल.
Visit : bahujannama.com