बहुजननामा ऑनलाइन टीम –भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) नवीन पॉलिसी आणली आहे. हे एलआयसी (LIC) चे जीवन अक्षय -7 (प्लॅन नंबर 857) आहे. ही एक प्रीमियम, विना-जोडलेली (नॉन-लिंक्ड), भाग न घेणारी (नॉन-पार्टिसिपेटिंग) आणि वैयक्तिक त्वरित एन्युटी स्कीम आहे. 25 ऑगस्ट 2020 पासून ती लागू होईल. एकरकमी देय दिल्यास, शेयर धारकांना 10 उपलब्ध एन्युटी पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. पॉलिसीच्या सुरूवातीस एन्युटी रेटची गारंटी दिली जाते आणि एन्युटी मिळवणा-या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यभर पेमेंट केले जाते. ही योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करता येईल.
या योजनेची किमान खरेदी किंमत 1 लाख रुपये आहे (किमान एन्युटी निकषानुसार). पॉलिसीमध्ये वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक एन्युटीचे प्रकार उपलब्ध आहेत. किमान एन्युटी वार्षिक 12,000 रुपये आहे. जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही. तसेच पाच लाखाहून अधिक किंमतीच्या खरेदीसाठी एन्युटी रेट वृद्धिसाठी इंसेंटिव म्हणून उपलब्ध आहे.
प्लान खरेदी किंमतीच्या परताव्यासह आयुष्यासाठी त्वरित एन्युटीचा पर्याय असणारी ही योजना 30 वर्ष ते 85 वर्षांपर्यंतच्या वयासाठी उपलब्ध आहे. पूर्वी हे शंभर वर्षे पर्यत होते.
अपंगांना अपंग अवलंबितांना) फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना देखील खरेदी करता येईल.
या योजनेत, कोणत्याही दोन वंशज, एकाच कुटुंबातील वंशज (आजी आजोबा, आई-वडील, मुले, नातवंडे), पती किंवा पत्नी किंवा भावंड यांच्यात संयुक्त जीवन एन्युटी घेता येते. पॉलिसी जारी झाल्यापासून तीन महिन्यांनंतर किंवा फ्री-लुक मुदतीच्या समाप्तीनंतर (जे नंतर असेल) कर्जाची सुविधा कधीही उपलब्ध असेल.