नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Akshay | जर दर महिना पेन्शनची व्यवस्था आतापासूनच करायची असेल तर यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) ‘जीवन अक्षय’ (Jeevan Akshay) पॉलिसीत गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीत एकरकमी गुंतवणूक करून दरमहिना एक निश्चित पेन्शन (get a fixed pension every month) मिळवू शकता. विशेष म्हणजे ही पेन्शन पॉलिसीधारकाला आयुष्यभर मिळते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पॉलिसीत पेन्शन मिळवण्यासाठी 10 वेगवेगळे पर्याय आहे. यापैकी एक पर्याय Annuity payable for life at a uniform rate (प्रति महिना पेन्शन पर्याय ‘अ’) असून यामध्ये आयुष्यभर पेन्शन मिळते. यासाठी कोणत्या अटी आहेत ते जाणून घेवूयात :-
– 30 ते 85 वर्षाच्या कुणीही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.
– किमान एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक अनिवार्य.
– कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही
– वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही आणि मासिक आधारावर पेन्शन.
– पॉलिसी जारी करण्याची तारीख 3 महिन्यानंतर लोन सुविधा.
– एकाच कुटुंबातील कुणीही दोन सदस्य जॉईंट एन्यूटी घेऊ शकतात.
– किमान वार्षिक पेन्शन 12 हजार रुपये ठरली आहे.
अशी मिळवू शकता दरमहिना 2 हजार रुपये पेन्शन :-
वय : 45
सम एश्युअर्ड : 400000
एकरकमी प्रीमियम : 407200
पेन्शन :
वार्षिक : 24840
अर्धवार्षिक : 12220
तिमाही : 6060
मासिक : 2010
web title: LIC Jeevan Akshay | You get money for a lifetime by investing in LIC’s ‘Ya’ policy, learn the terms
Pune News | सरकारी कामांसाठी राष्ट्रवादी कार्यालय हक्काचे व्यासपीठ – शहराध्यक्ष प्रशांत जगताप