बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : वृत्त संस्था:सोमवारी सुदर्शन टीव्हीच्या सुनावणीदरम्यान व्हिडीओ कॉल वरून होणाऱ्या सुनावणीला एक वकिल(Lawyer ) शर्ट न घालताच उपस्थित राहिला हे पाहून सर्वोच्च न्यायालयच्या (Supreme Court)न्यायाधीशांना धक्काच बसला. जेव्हा खटल्यासंदर्भातील सुनावणी सुरू झाली तेव्हा मोठ्या स्क्रीनवर काही क्षणातच न्यायाधीशांना शर्ट न घातलेल्या अवस्थेतील व्यक्ती दिसली. ना. डी वाय चंद्रचूड (D. Y. Chandrachud) आणि त्यांच्या खंडपीठानं आक्षेप घेत ही व्यक्ती कोण होती यासंदर्भात विचारणा केली. न्यायमुर्तींनी 4 वेळा विचारणा करूनही कोणीच उत्तर दिलं नाही. झालेला गोंधळ पाहून विकलानं(Lawyer ) लॉग आऊट केल्यानं यावर कोणीच उत्तर दिलं नाही असं समजत आहे.
न्या. चंद्रचूड यांनी खटल्याची सुनावणी पुढं ढकलण्यात आल्यानंतर या प्रकाराबद्दल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. लाईव्ह लॉ इन या वेबसाईटनं आपल्या वृत्तात तसं नमूद केलं आहे. सुनावणीसाठी कोणीतरी शर्ट न घालताच उपस्थित राहिलं होतं. या संदर्भात काही ठोस नियम हवेत असं न्या. चंद्रचूड यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. तर घडलेला प्रकार खूप वाईट होता असं खंडपीठातील सदस्य न्या इंदू मल्होत्रा यांनी सांगितलं.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही घटना अक्षम्य असल्याचं म्हटलं आहे. न्या चंद्रचूड यांनी मेहता यांना सांगितलं की, या प्रकरणासंदर्भात संबंधित वकिलाशी बोलून अशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना कराव्यात. ओपइंडियाची बाजू मांडणाऱ्या वकिलाकडून ही चूक झाल्याचं लाईव्ह लॉ इननं म्हटलं आहे.
न्या चंद्रचूड म्हणाले, सध्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉलवरून होत असली तरी असे प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमानच आहे. या व्हिडीओवरून होणाऱ्या सुनावण्या या इतर सुनावण्यांप्रमाणेच असून वकिलांनी यासंदर्भात जास्त दक्ष राहणं गरजेचं आहे. या घटनांसदर्भात कारवाई करण्याची आपली इच्छा नाही. मात्र सुनावणीला येताना वकिलांनी आपम न्यायाधिशांसमोर जाणार आहोत याचं भान ठेवलं पाहिजे.
गुजरात उच्च न्यायालयानं (High Court of Gujarat) काही आठवड्यांपूर्वी व्हिडीओ कॉलवरील सुनावणीदरम्यान धूम्रपान केल्या प्रकरणी वकिलाला दंड ठोठावला होता. त्यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानं (Rajasthan High Court) सुनावणीसाठी बनियानमध्ये उपस्थित राहणार्या वकिलाला फटकारलं आहे.