लासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता लासलगाव येथील कोरनटाईन सेंटर सुरू होऊन कोविड टेस्ट सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. लासलगाव व परिसरामध्ये covid-19 सदृश्य रुग्ण आढळल्यानंतर त्याची तपासणी करण्याकरता पिंपळगाव बसवंत येथे रुग्णास नेले जाते. शहरापासून पिंपळगाव बसवंत चे पंचवीस किलोमीटर अंतर असून सदरचे कोविड सेंटर पिंपळगाव बसवंत शहरापासून बरेच लांब आहे. त्यामुळे रुग्णास मनस्ताप सहन करावा लागत आहे. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये कोरोनाचा वाढता आलेख दिसून येत आहे. लासलगाव व विंचूर या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोरोना विषाणूचा थैमान घातलेलं आहे.
दररोज कोरोनाग्रस्त तपासणी अहवाल संख्येत वाढ होत आहे. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राने २०० रुग्णांचा टप्पा ओलांडत एकूण रुग्ण संख्या २१० वर गेलेली आहे.यातील 153 रुग्णांनी कोरोनावर मात करत घरवापसी केलेली आहे. यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित कोरोनाग्रस्त रुग्णांवर लासलगाव व पिंपळगाव बसवंत कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून लासलगाव ओळखले जाते त्यामुळे येथे मोठी वर्दळ असते.मात्र या ठिकाणी वाढती रुग्ण संख्या बघता लासलगाव शहरांमध्येच शासकीय कोविड तपासणी सेंटर सुरू व्हावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
प्रतिक्रिया – डॉ चेतन काळे,तालुका वैद्यकीय अधिकारी
लासलगाव मध्ये कोरंटाईन सेंटर सुरू करत याठिकाणी रुग्णांची नमुना तपासणी सुरू करण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविलेला आहे लवकरच लासलगाव येथे कोरोना तपासणी केंद्र सुरू होणार आहे.