पाटणा : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागतील आणि आपपल्या परीने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील तसेच लोकसभेच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेबद्दल बिहारच्या राजकारणातील बादशाह मानल्या जाणाऱ्या लालू प्रसाद यादव यांनी या सभेवर असे वक्तव्य केले आहे की काही क्षणासाठी मोदीही चक्रावून जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पाटणा येथील गांधी मैदानामध्ये पार पडली येथे लोकांनी मोदींच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, लालू प्रसाद यादव यांना ही गर्दी काहीच वाटत नाही. एवढी गर्दी तर आपण पान ठेल्यावर गाडी थांबवल्यावर जमा होते, असे म्हणून लालूंनी मोदींच्या सभेची चक्क खिल्ली उडवली. त्यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करून हे वक्तव्य केले आहे.
सरकारी तंत्राचा उपयोग करून नरेंद्र मोदी, नीतीश कुमार आणि रामविलास पासवान यांनी महिनाभरात जितकी गर्दी जमा केली, तेवढी गर्दी तर मी एखाद्या पान ठेल्यावर गाडी थांबवल्यावर जमा होते, असे लालूने ट्विटरवरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. तर, गर्दी दाखवण्यासाठी एक सल्लाही लालू प्रसाद यादवांनी मोदींना दिला. ते म्हणाले, की कॅमेरा झूम करा जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसेल.