नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याचे कामकाज हे ४ दिवस आणि ३ दिवस सुट्टी मिळू शकते अशी जोरदार चर्चा नोकरदारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सुरु होती. मात्र आता खुद्द केंद्रीय कामगार मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल आहे. लोकसभेत लिखित स्वरूपात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आठवड्यात जादा काम करून घेण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभेत बोलताना गंगवार म्हणाले, आठवड्यात चार दिवस काम किंवा ४० तासांचे काम यासदर्भात कोणतीही योजना नाही.
आठवड्यातून पाच दिवस चौथ्या वेतन आयोगाच्या सूचनेच्या आधारे आणि दररोज साडेआठ तास काम भरत सरकारच्या नागरी प्रशासकीय कार्यालयांमध्ये केले जाते. तेच पुढे सातव्या वेतन आयोगाने देखील कायम ठेवले आहे. गेल्या काही दिवसापासून नवीन कामगार कायद्यांनुसार, सरकार कामकाजाचे तास १२ पर्यंत वाढवू शकते. त्याचबरोबर आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस पगाराच्या सुट्टीचा पर्याय देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. हा पर्याय देखील नवीन कामगार संहितेच्या नियमात ठेवला जाईल, ज्यावर कंपनी आणि कर्मचारी परस्पर संमतीने निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता केंद्रीय कामगार मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने हि चर्चा आता थांबली आहे.
सरकारकडून कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. मात्र अनेक योंजनासंदर्भातील माहिती कामगारांपर्यंत पोहोचतच नाही. काही योजना कामगारांच्या खूप उपयोगाच्या असतात मात्र माहिती नसल्याने त्याचा कामगारांना लाभ घेता येत नाही. उत्तर प्रदेशमध्ये योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार कामगारांच्या मुलांचा शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी नसेल तर लाभ मिळणार नाही.काही निकषांची पूर्तता केल्यानंतरच कामगारांची नोंदणी आणि ‘लेबर कार्ड’ तयार होऊ शकते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट http://www.uplabour.gov.in या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० वर्ष असायला हवी. हे कार्ड फक्त गरीब प्रवर्गातील कामगारांच्या कुटुंबानाच दिलं जातं. त्यानंतर कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविली जाते.