बहुजननामा ऑनलाईन टीम : स्वयंघोषित फिल्म क्रिटीक आणि अॅक्टर कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरके (KRK) आपल्या वादग्रस्त विधानामुळं कायमच चर्चेत येत असतो. तो अनेकदा सेलिब्रिटींवरही टीका करत असतो. कमाल सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव असतो. केआरकेनं आता यशराज फिल्म्सचे चेअरमन (Chairman of Yash Raj Films) आदित्य चोपडा (Aditya Chopra) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाला केआरके ?
केआरकेनं ट्विट करत लिहिलं की, एका अॅक्ट्रेसनं मला सांगितलं जिला यशराज फिल्म्सकडून लाँच करण्यात आलं होतं. जर आदित्य चोपडा निर्माता नसते तर सर्जरी तज्ञ असले असते. कारण ते प्रत्येक मुलीला कोणत्या ना कोणत्या सर्जरीचा सल्ला देत असतात. हेच कारण आहे की, यशराज फिल्म्सच्या प्रत्येक अॅक्ट्रेसनं सर्जरी केली आहे.
— TimePass (@TimePassTalks) December 17, 2020
केआरकेनं केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअरही केलं आहे.
आदित्य चोपडा इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. अशात आता कमालच्या टीकेला त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.