नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेती सुलभ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढविण्यासाठी असे ‘कृषी किसान अॅप’ असे मोबाइल अॅप सुरू केले आहे. या माध्यामातून शेतकरी कृषि अधिकाऱ्यांकडे न जाता घरबसल्या त्यांना हवी असलेली शेतीसंबंधित माहिती मिळवू शकतील. ज्या योजना फाइल मध्येच पडून राहत होत्या त्या आता थेट शेतकऱ्यांच्या मोबाइलवर पोहचल्या आहेत. हे अॅप कृषि मंत्री नरेंद्र तोमर यांनी लॉन्च केले. नॅशनल फूड सिक्योरिटी मिशनशी संबंधित कृषि मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन मोठ्या गोष्टींचा फायदा मिळेल.
कृषि किसान अॅप अंतर्गत सरकारकडे जियो टॅग युक्त पीक डेमो शेत आणि बियाणे केंद्र आहेत. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ना की फक्त प्रदर्शनांची माहिती मिळेल तर त्याचा फायदा देखील घेता येईल. अधिकाऱ्याने सांगितले की मिनी किट बियाणांची संख्या वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत आणि हे जियो टॅग युक्त असल्याने सरकार माहिती देखील मिळवू शकेल की मिनी किटचा वापर करण्यात येत आहे की नाही.
१. शेतीचे वैज्ञानिक डेमोस्ट्रेशन –
यातून शेतकऱ्यांना आपल्या भागातील वैज्ञानिक शेतीच्या डेमोस्ट्रेशनची माहिती मिळेल. हे कळेल की त्यांच्याकडे कुठे वैज्ञानिक पद्धतीने शेती होते, ही भारत सरकारची अशी योजना आहे की शेतकरी कोणत्याही रिसर्च सेंटर बरोबरच शेतीचे वैज्ञानिक मॉडेल पाहू शकतील. याने लक्षात येईल पीकची चांगली लावणी कशी करायची.
– जर तुम्ही देखील एक शेतकरी असाल आणि आपल्या शेतातील पीकांच्या रिसर्चचे एक मॉडेल सादर करु इच्छितात तर त्यासंबंधित वैज्ञानिकांचे मार्गदर्शन देखील तुम्ही मिळवू शकतात.
– तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यास सरकार देखील पैसे देते, ज्यात वैज्ञानिक निश्चित करतील की खत किती, पाणी किती, किटकनाशक किती वापरायचे. पीकांची वॉरेंटी देखील निश्चित करण्यात येईल.
२. सीड हब –
या अॅपवरुन देशभरातील सीड हब बद्दल माहिती देण्यात येत आहे. याअंतर्गत देशात 150 सीड हब देण्यात आले आहेत. ज्यात वैज्ञानिक तुम्हाला वॉरेंटी असलेली बियाणे देऊन, मार्गदर्शन करुन तुमच्या शेतात त्याची पेरणे करतील. जेव्हा वैज्ञनिकांच्या देखरेखीत ही शेती होईल तेव्हा तुम्हाला याचा चांगला लाभ मिळेल.
३. मिनी किट डिस्ट्रीब्युशन –
अनेकांना माहिती नसेल की सरकार नाममात्र दरात चांगली बियाणे उपलब्ध करुन देते आणि चांगले खत उपलब्ध करुन देते, ही सुविधा कोठे आणि कशी मिळेल याची माहिती या कृषि किसान अॅपवर मिळेल.
Visit : bahujannama.com