पुणे : – Koregaon Park Pune Crime News | वडीलांना मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन एका तरुणाला सहा जणांनी बेदम मारहाण (Marhan) करुन जखमी केले. तसेच ‘आम्ही दरोडे मळ्याचे भाई आहोत, नादाला लागायचे नाही, नाहीतर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि.8) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मेन रोडवर (Main Road Koregaon Park) घडला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
याबाबत सागर बापु फासगे (वय-25 रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. तर रोहित कांबळे याला पोलिसांनी (रा. दरोडे मला, कोरेगाव पार्क) याला अटक केली आहे. तर करण उर्फ कॅरी, विशाल लाचारर (रा. ताडीवाला रोड), भैय्या अदमाने, रुपेश साठे उर्फ रुपल्या यांच्यावर आयपीसी 324, 323, 506, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, आरोप भैय्या अदमाने व त्याच्या सोबत असणाऱ्या इतरांनी फिर्यादी यांच्या वडिलांना मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठि फिर्यादी बालाजी सुपर मार्केट येथे गेले होते. त्यावेळी अदमाने व त्याच्या सोबत असणाऱ्या मुलांनी फिर्यादी त्यांचे वडील, भाऊ व चुलत भावाला हाताने मारहाण केली. तर रोहित कांबे याने लाकडी बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच ‘आम्ही दरोडे मळ्याचे भाई आहोत, नादाला लागायचे नाही, नाहीतर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत माजवून निघून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.