नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ग्राहकांसाठी एक अतिशय विश्वासार्ह नाव आहे. बँक अनेक लाभदायक योजना आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत असते. तसेच परताव्यासमवेत त्यांना सुरक्षिततेची हमी देखील देतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत.
SBI एन्युटी योजना :
या योजनेअंतर्गत आपण सुरक्षित गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवू शकता. एन्युटी योजनेत, पैसे गुंतवल्यावर ठराविक वेळानंतर त्या रकमेवर व्याज लावून नियमित पैसे मिळू लागतात.
योजनेचे वैशिष्ट्य :
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे आपण किमान वार्षिक १००० रुपयांसह प्रारंभ करू शकता आणि गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत तुम्ही एकाच वेळी कितीही रक्कम गुंतवू शकता आणि त्या आधारावर तुम्हाला व्याज लागू करून निश्चित वेळेवर नियमित रक्कम मिळणे सुरू राहील.
Make a lump sum payment once and for the entire tenure of the Annuity Deposit Scheme enjoy numerous benefits. To know more, visithttps://t.co/13pRBgvbkp pic.twitter.com/zHdELPsL82
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 8, 2019
गुंतवणूकीचा कालावधी
महत्वाचे म्हणजे यामध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त खाते, अल्पवयीन देखील प्रौढांकडे खाते उघडू शकते. या योजनेत आपण गुंतवणूकीची कालावधी ३ वर्षे, ५ वर्षे, ७ वर्षे किंवा १० वर्षे निवडू शकता. यासाठीचे व्याज दर निवडलेल्या मुदतीच्या ठेवीसाठी निश्चित केलेल्या व्याजदराप्रमाणेच असतील. यासाठी जर आपण ५ वर्षांच्या कालावधीसाठी एन्युटी योजना निवडली असेल तर आपल्याला ५ वर्षांच्या एफडीवर जितक व्याज मिळेल तितके व्याज मिळेल.
एन्युटी योजनेचा लाभ :
यामध्ये तुम्हाला एकदा एफडी प्रमाणे रक्कम जमा करावी लागेल, परंतु तुम्हाला एकदाच व्याजासह रक्कम न मिळाल्यास नियमित अंतराने तुम्हाला व्याजासह पैसे मिळतात.
Visit : bahujannama.com