बहुजननामा ऑनलाइन टीम : लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने एका युवतीवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर त्याने सुमारे सहा महिने तिला फरीदाबाद येथे पत्नी म्हणून ठेवले. याच दरम्यान तिचे एकदा गर्भपातही केले. पीडितेच्या तक्रारीची दखल घेत एसपीने कारवाईचे आदेश दिले आहेत. कोतवाली पोलिसांनी अहवाल दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मूळची एटा जिल्ह्यातील साकीत पोलिस स्टेशन परिसरातील युवती सध्या शहरातील एका एरियामध्ये तिच्या आई-वडिलांसह भाड्याच्या घरात राहत आहे.
१० सप्टेंबर २०१७ रोजी मुलीच्या कुटूंबाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बालाजी पुरम येथील रहिवासी सुमंत सक्सेना उर्फ बबलू आला होता. यानंतर बबलूचे घरी येणे-जाणे सुरु झाले. लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने युवतीशी संबंध ठेवले. तो कधी मुलीच्या घरी येत असे तर कधी तिला घरी बोलवत असे. मुलीच्या कुटूंबाला माहिती समजल्यानंतर त्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी करुन दिले. जेव्हा या दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी कुटुंबीयांना कळले तेव्हा त्यांनी फिरोजाबादमध्ये मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी केले होते. आरोपीने तिच्यासोबत असलेले नाते सासरच्या लोकांकडे उघड केले. ज्यामुळे महिलेकडून तिच्या पतीने घटस्फोट घेतला होता. यानंतर आरोपीने पुन्हा एकदा तिला आपल्या जाळ्यात अडकवले होते.
यानंतर आरोपीने युवतीचा घटस्फोट करुन फरीदाबादला नेले. तेथे त्याने सहा महिन्यांसाठी भाड्याच्या घरात पत्नी म्हणून तिला ठेवले. तिने असा आरोप केला आहे की, या काळात तिला औषध देऊन तिचा गर्भपातही करण्यात आला. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपींने युवतीला सिटी बस स्टँडवर सोडले निघून गेला. यानंतर युवतीने एसपी अजय शंकर राय यांच्याकडे त्या ओरापीने तिच्या आयुष्याचे नुकसान करुन दुसरे लग्न करत असल्याची तक्रार दिली. शनिवारी रात्री एसपीच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी अहवाल दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Visit : bahujannama.com