मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सासू विजया पेडणेकर (Vijaya Pednekar) यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने सोमवार (दि. 31) रोजी मुंबईत निधन झाले. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मात्र त्यांच्या सासूच्या निधनाला बळी असे म्हंटले आणि भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए (SRA) घोटाळ्याचे आरोप केले होते. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) पेडणेकरांची दोन वेळा चौकशी झाली होती. याच चौकशीचा पेडणेकरांच्या वयोवृद्ध सासूबाईंनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यृ झाला, असा आरोप किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. माझ्या कुटुंबातील एक बळी घेतला गेला. तरी देखील मी माझ्यावरील चौकशीला समोरी जाणार आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. किरीट सोमय्या यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि दादर पोलिसांकडून होणारी चौकशी यांच्या विरोधात पेडणेकर लवकरच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटण्याची शक्यता आहे.
वरळी येथील गोमाता नगर येथे विकासकाने एका प्रकल्पातील सहा गाळे किशोरी पेडणेकर यांना दिल्याचा आरोप
सोमय्या यांनी केला होता. याविरोधात किरीट सोमय्यांनी मागील अनेक दिवस आवाज उठवला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. या तिघांची चौकशी केली होती.
यावेळी संबंधितांनी किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतले होते. त्यावरुन हा वाद चिघळला होता आणि पेडणेकर
यांची पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली होती. पेडणेकरांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मला राजकीय सुडापोटी यात गोवल्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Kishori Pednekar | former mumbai mayor kishori pednekars mother-in-law died of heart attack
हे देखील वाचा :
Ashish Shelar | राज ठाकरे यांच्या पंतप्रधानांवरील टीकेला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर