बहुजननामा ऑनलाइन – Kirit Somaiya | अभिनेता शाहरुख खानचा (saha rukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan) एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केलीये. वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखवत एससी कोट्यातून नौकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या वादात उडी घेतली आहे.
सोमय्या यांनी ट्विटकरत या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. नवाब मलिक ड्रग माफियासाठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नसून मुस्लिम असल्याचा आरोप करतात. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) १५,००० कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी कंपनीचे नाव जयास्तुते ठेवतात, तर जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) अनंत करमुडेचे अपहरण करतात. अजित पवार (Ajit Pawar) बेनामी व्यवहार द्वारा कारखाना लाटतात, हे सर्व ठाकरे सरकारची माफियागिरी असल्याचा आरोप सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.
ठाकरे सरकार ची माफियागिरी
नवाब मलिक ड्रग माफिया साठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नाही मुस्लिम आहे आरोप करतात
हसन मुश्रीफ ₹१५,००० कोटीचा कॉन्ट्रॅक्ट साठी कंपनीचे नाव जयास्तुते ठेवतात
जितेंद्र आव्हाड अनंत करमुडे चे अपहरण करतात
अजित पवार बेनामी व्यवहार द्वारा कारखाना लाटतात
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 26, 2021
दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाहीये.
शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोग्य विभागात घोटाळा होतोय, पण तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टारगेट करायचं. त्याच्यावर वयक्तिक हल्ला करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे, अशी टीका वाघ यांनी केलीये.
Web Title : Kirit Somaiya | Kirit Somaiya on thackeray government nawab malik ncb officer sameer wankhede.
EPFO Alert | पीएफ मध्ये आलेले व्याजाचे पैसे होतील गायब, चुकूनही शेयर करू नका ‘हा’ नंबर; जाणून घ्या