बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस किम शर्मा (Kim Sharma) गेल्या अनेक महिन्यांपासन सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. परंतु तिचे चाहते तिला सोशलवर फॉलो करतात. तीदेखील चाहत्यांसाठी आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. आपल्या हॉटनेसमुळं कायम चर्चेत असणाऱ्या किम शर्मानं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
किमनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशलवर राडा घालत आहेत. फोटोत किम बोल्ड बिकिनीत दिसत आहे. किमचा हा हॉट अवतार सध्या खास चर्चेत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरची बिकिनी घातली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.
View this post on Instagram
किम आजही खूप यंग आणि फिट दिसते. तिला पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 41 वर्षांची आहे. सध्या किम आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. चाहते तिला पाहून यामुळंच अवाक् झाले आहेत की, ती 41 वर्षांची वाटतच नाही. अनेकांनी तशी कमेंटही केली आहे.
View this post on Instagram
किमचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
किमच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर एक काळ असा होता जेव्हा माजी क्रिकेटर युवराज सिंग सोबतच्या अफेअरमुळे किम रातोरात चर्चेत आली होती. त्यांचं ब्रेकअप होऊन आता मोठा काळ गेला आहे. एकदा युवराज सिंगच्या वाढदिवसावेळी किमनं स्पेशल पोस्ट शेअर केली होती. किम आणि युवराज सध्या चांगले मित्र आहेत. युवीची पत्नी हेजलसोबतही किमची चांगली मैत्री आहे.
View this post on Instagram
किमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, केनियाई बिजनेसमन अली पुंजानी सोबत 2010 साली ती विवाहबंधनात अडकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करणं बंद केलं. मुंबई सोडून ती केनियाला स्थायिक झाली होती. परंतु हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. किमचं नाव रॉक ऑनचे डायरेक्टर अभिषेक कपूर आणि डिझायनर अर्जुन खन्ना यांच्या सोबतही जोडलं गेलं आहे.
View this post on Instagram
किम काही दिवसांपूर्वीच तिच्या आई वडिलांसह अभिनेता अमित साध (Amit Sadh) सोबत डिनर करताना दिसली होती. यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चेच्या बातम्या समोर आल्या होत्या. इतकंच नाही तर ते गोव्यात स्पॉट झाले होते.
View this post on Instagram
किमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मोहब्बते या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. तुम से अच्छा कौन है, नहले पे दहला, कहता है दिल बार-बार, जिंदगी रॉक्स अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. परंतु बॉलिवूडमध्ये तिला आपलं स्थान तयार करता आलं नाही.
View this post on Instagram