नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपाहार्य सीडीमुळे एकच खळबळ उडाली होती. एका सामाजिक कार्यकर्त्याने जारी केलेल्या सीडीत रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रारही करण्यात आली आहे.
दरम्यान जारकीहोळी यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हंटले होते. तसंच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
या कथित सीडीतील महिलेचे अपहरण झाल्याचा दावा संबंधित महिलेच्या आई वडिलांनी केला आहे. बुधवारी बेळगाव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे. तसेच आपला जीव धोक्यात असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे.
पीडितेच्या वडिलांनी सांगितल्यानुसार जारकीहोळी यांची कथित सीडी २ मार्चला उघडकीस आली होती. त्याच दिवशी आपल्या मुलीबरोबर शेवटचं बोललो. संबंधित व्हिडीओ मध्ये माझी मुलगी नसून कोणीतरी माझ्या मुलीसारखी दिसणाऱ्या महिलेचा वापर केला असून खुद्द मुलीनेच आईला या प्रकरणाचा खुलासा केला असल्याचंच वडीलांनि यावेळी सांगितले. पीडितेच्या पालकांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
जारकीहोळी यांचं वादग्रस्त संभाषण काही दिवसांपूर्वी लीक झालं होतं. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले असून येडियुरप्पा भ्रष्टाचारी आहेत. कर्नाटकचे मुखमंत्री केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी होतील. जारकीहोळी यांनी एवढाच म्हटलं नाही तर कानडींना काही काम नाही… मराठी माणसे चंगली आहेत. हे संभाषण व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी या संभाषणाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. या टेपमध्ये केलेल्या आरोपाचा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.
सीडी प्रकरण बाहेर आणणारे नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, नोकरीचे आमिष दाखवून रमेश जारकीहोळी यांनी तरुणीवर अत्याचार केला आहे. कथित सीडीमध्ये तरुणीला ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी देतो असे सांगत शारिरिक संबंध ठेण्याबाबत जारकीहोळी बोलत असल्याचा दावा केला आहे.