बहुजननामा ऑनलाइन टीम – Kevin Pietersen PAN Card | इंग्लंडचा माजी खेळाडू केवीन पीटरसन (Kevin Pietersen) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. केवीन पीटरसनचे पॅनकार्ड (PAN Card) हरवले असून त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) याबाबत मदत मागितली असून यासंदर्भात त्याने (Kevin Pietersen PAN Card) ट्विट केलं आहे.
मी सध्या प्रवास करत असून माझे पॅनकार्ड हरवले आहे. मला त्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मला कोणी अशा व्यक्तीकडे पाठवू शकेल का, जो मला मदत करेल, असं केवीन पीटरसनने म्हटलं आहे. केवीन हे ट्विट हिंदीमध्ये केलं असून त्यामध्य नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.
https://twitter.com/KP24/status/1493536477237497856
केवीनचे हे ट्विट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले, त्यानंतर त्याला आयकर विभागाने (Income Tax Department) मदत केली. केवीनला मेल करायला सांगितलं आहे. भारतात आपल्या महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, केवीन पीटरसन भारतीय संघाची (Team India) खिल्ली उडवण्याबाबत ट्विट (Tweet) करत असतो. त्याला भारताचे काही माजी खेळाडूही (Indian Players) मजेशीर रिप्लाय देतात, त्यावेळी एक जुगलबंदी पाहायला मिळते.
Web Title : kevin pietersen pan card loss india tourism twitter income tax pm narendra modi