बहुजननामा ऑनलाईन
सर्वात प्रसिद्ध इंस्टंट मेसेजिंग सर्व्हीस व्हॉट्सअॅप युजर्ससाठी खूप सारे नवीन फीचर्स आणत आहे. हे फीचर कोणते आहेत हे युजर्सला अॅप अपडेट केल्यानंतर कळणारच आहेत. मोबाईल अॅपशिवाय डेस्कटॉपवर सुद्धा काही फीचर्स टेस्ट केले जात आहेत.
1) ग्रुप कॉलसाठी वेगळी रिंगटोन – पुढील अपडेट्समध्ये व्हॉट्सअॅप युजर्सला ग्रुप कॉल्ससाठी वेगळी रिंगटोन सेट करण्याचा ऑप्शन मिळू शकतो. यामुळं युजरला फोन न पाहताही कळेल की त्यांना ग्रुप कॉल आला आहे.
2) व्हॉट्सअॅप डुडल्स – सुरुवातीला व्हॉट्स अॅप डुडल्स केवळ डेस्कटॉप किंवा वेब व्हर्जनवर मिळत होतं. परंतु फ्युचर अपडेट्सनंतर मेसेजिंग अॅप अँड्रॉईड व्हर्जनसाठी बॅकग्राऊंड डुडल्स घेऊन येऊ शकतं.
3) नवीन कॉलिंग युआय – पुढील अपडेटमध्ये नवीन आणि चांगला इंटरफेस पाहायला मिळू शकतो. यानंतर कॉल बटन खाली मुव्ह केले जाऊ शकते. कॉल इंटरफेसमध्ये इंफो बटन, ऑडिओ बटन आणि व्हिडीओ बटन सुद्धा कॅमेरा आणि मेसेजिंग बटनसोबत दिसेल.
4) अॅनिमेटेड स्टीकर्स – व्हॉट्सअॅपवर चॅटींग एक्सपिरीयंस आणखी चांगले करण्यासाठी युजर्सना लवकरच अॅनिमेटेड स्टीकर्स मिळू शकतात. कंपनी या स्टीकर्सला टेस्ट करत आहे. खूप मेसेजिंग अॅपमध्ये आधी हे फीचर दिलं जात होतं.
5) शॉर्टकट कॅटलॉग अॅक्सेस – व्हॉट्सअॅप बिजनेस अकाऊंटवर युजर्सला कॅटलॉग फीचरचे शॉर्टकट अॅक्सेस मिळू शकते. तसेच पोर्टफोलियो पाहिले जाऊ शकते. तसेच नवीन कॉलिंग बटन देखील या फीचरला आणखी चांगलं करीत दिलं जाऊ शकतं.