Katraj Kondhwa Road Accident | पुणे : कात्रज कोंढवा रोडवर भीषण अपघात ! एकाचा मृत्यु, पाच जण जखमी

Katraj Kondhwa Road Accident | Pune: Terrible accident on Katraj Kondhwa Road! One dead, five injured

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Katraj Kondhwa Road Accident | कात्रज कोंढवा रोडवरील कोंढवा येथील स्मशानभूमीजवळ गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. उतारावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पाठीमागून एकापाठोपाठ एक अशा जवळपास 10 गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यु झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कात्रज कोंढवा रोड अपघातामुळे नेहमीच चर्चेचा राहत आला आहे. अवजड वाहतूक, आजूबाजूला झालेल्या वस्त्या, यामुळे हा रस्ता कायमच अपघातग्रस्त होत आला आहे. कोंढवा येथील स्मशानभूमीजवळ सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. खडी मशीनच्या दिशेने सिमेंटचे पाईप घेऊन जाणार्‍या ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे असलेल्या कार, शालेय व्हॅन, दुचाकी यांना धडका देत पुढे जात राहिला. त्याने 8-10 वाहनांना धडक दिली असून त्यात 5 जण जखमी झाले आहेत. प्रशांत कृष्णा चौरे (वय 43, रा. धनकवडी) या मोटरसायकल चालकाचा मृत्यु झाला आहे.

ट्रकचालक तेजस रामभाऊ काकडे (वय २२, रा. केज, बीड) याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहने बाजूला घेऊन
वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी
या रोडला भेट देऊन त्यावरील समस्या जाणून घेतल्या होत्या.

  • Web Title : Katraj Kondhwa Road Accident | Pune: Terrible accident on Katraj Kondhwa Road! One dead, five injured