बहुजननामा ऑनलाईन टीम – फिचर फोन बनवण्यासाठी प्रसिद्ध कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्बन कंपनीने केएक्स सीरिजचे ४ नवीन फोन लॉन्च केले आहेत. या चर फोनची नावे KX 3, KX25, KX26 आणि KX27 अशी आहेत. या चारही फोनची किंमत सर्वसामान्यांना परवडणारे आहे. ग्राहकांना हे फोन ७०० रुपये ते १ हजार रुपयांच्या आत खरेदी करता येऊ शकते. भारतीय बाजारात महिन्याभरात हे चारही फोन विक्रीसाठी उपलब्ध होतील.
कार्बन केएक्स ३ फोनमध्ये ४. ५ इंचाचा डिस्प्ले, डिजिट रिड- आउट आणि व्हिडिओ म्युझिक प्लेअर देण्यात आला आहे. ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून यात पॉवर आणि सेविंग मोड सुद्धा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये बूम बॉक्स स्पीकर आणि रेकॉर्डरसोबतच वायरलेस एफएम ही देण्यात आले आहे.
कार्बन KX25 फोनमध्ये ६. सेंटिमीटरचा डिस्प्ले आणि सुपर ब्राईट ४ एलईडी टॉर्च देण्यात आला आहे. यामध्ये १८०० एमएएच क्षमतेची बॅटरी सोबतच, डिजिटल कॅमेरा, एफएम रेडिओ आणि ड्युअल सिमकार्डची सुविधा देण्यात आली आहे. तर कार्बन केएक्स २६ फोनमध्ये ६.१ सेंटिमीटरचा डिस्प्ले, डिजिटल कॅमेरा, १४५० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. केएक्स २७ या फोनमध्ये बॅटरी बॅकअप जास्त प्रमाणात आहे. यामध्ये १७५० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून त्याचबरोबर फोनमध्ये ब्लूटूथ, कॅमेरा, म्युझिक प्लेअर, रेकॉर्डरसह वायरलेस एफएम रेडिओ आणि तसेच पॉवर सेविंग मोडही देण्यात आले आहे. ७०० रुपये ते १००० रुपये अशी या सर्व फोनची किंमत आहे.