औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पीक विमा कर्ज आणि हातनूर रस्त्याच्या कामाबद्दल कन्नडे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज तीन तास रास्ता रोको केला. पीक विमा कर्जासंदर्भात शेतकऱ्यांना अडचण आहेत. तसेच हातनूर रस्त्याच्या कामासंदर्भात जाधव यांनी आंदोलन सुरु केले आहे. आज त्यांनी तीन तास रस्ता अडवून ठेवला. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा. तसेच हातनूर रस्त्याचे काम चांगले व्हावे. यासाठी आमदार जाधव यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. जाधव यांनी सकाळी दहा वाजता आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. पोलिसांनी अनेकवेळा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. अखेर बराच वेळ रस्ता आडवल्याने कन्नड ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांकडून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. जाधव यांच्या आंदोलनामुळे हतनूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले.