मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता. कंगनाच्या याच मुद्द्यावरून अजूनही वाद सुरू आहे. दरम्यान सुशांतच्या वकिलांनी कंगना या प्रकरणाचा फायदा घेऊन तिचा अजेंडा मांडत असल्याचं सांगितलं त्यानंतर कंगनाला सोशल मीडिया वर ट्रोल केलं जात होतं.
आता सुशांतची बहीण श्वेताने कंगनाला पाठिंबा देत वकिलांचा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणाले की मला आणि सुशांतच्या कुटुंबाला कंगनाने उपस्थित केलेल्या मुद्द्याची काहीही अडचण नाही. ‘मी माझ्या भावाच्या सर्व वारियरना सल्युट करते. तुम्ही सगळेजण आमची ताकद आहात आणि तुम्ही रिअल हिरो आहात, तुम्ही आमच्या सोबत राहा’, असं श्वेताने एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.
कंगना म्हणाली, ‘थँक यू श्वेता दी..थँक यू तुझ्या चांगल्या शब्दांसाठी..थँक यू माझ्या विरोधातील अफवांना दूर केल्याबद्दल’
कंगनाने आलिया भट्ट आणि करण जोहरवर साधला निशाणा
कंगना राणावतने ट्विटर वर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये एका बाजूला कंगनाचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला करण जोहर, आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि वरुण धवन यांचे फोटो आहेत. कंगनाच्या फोटोवर ‘सॅनिटायझर’ असं लिहिलं असून बाकी फोटोवर ‘व्हायरस’ असं लिहिलं आहे. कंगनाने हा फोटो शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिलं आहे, ‘चुहो वापस बिल में जावो वरना गब्बर आ जायेगा, हॅशटॅग बायकॉट कंगना से मुझे डर नहीं लगता, जावो कुछ और ट्राय करो’
कंगनाने काही दिवसांपूर्वी करण जोहरला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार वापस घेण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती. याबाबद्दलचं ट्विट देखील तिने केलं होतं. ती म्हणाली होती, ‘करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार वापस घेण्यात यावा, त्याने मला सर्वांसमोर धमकी दिली होती आणि इंडस्ट्री सोडायला सांगितलं होतं. त्याने उरी घटनेच्या वेळी पाकिस्तानची बाजू घेतली होती आणि आता त्याने सेनेच्या विरुद्ध अँटीनॅशनल सिनेमा काढला आहे.’