पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली संबंधित प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल (Shivani Vishal Agarwal) यांना अटक करण्यात आली आहे.
विशाल अगरवालला याआधीच अटक करण्यात आली आहे. विशाल अगरवालला (Vishal Agarwal) तुरुंगातून (Yerawada Jail) गुन्हे शाखेने ताब्यात (Pune Crime Branch) घेतले आहे. उद्या म्हणजेच २ जूनला आई-वडिलांना सोबतच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटक केल्यानंतर शिवानी अगरवाल यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित मुलाच्या आईकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रक्त नमुने बदलणे (Blood Sample Tampering Case), पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये शिवानी अगरवाल यांचा सहभाग तपासण्यात येत आहे.
सबळ पुरावे हाती लागल्यावरच कारवाई सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी देखील अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडील विशाल अगरवाल हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.