बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा हिच्यासाठी काजोलनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. न्यासा शिक्षणासाठी सिंगापूरला असते. आता शिक्षणासाठी ते न्यासाला एकटीला सोडायला तयार नाहीत. काजोल देखील तिच्यासोबत सिंगापूरला जाण्याच्या तयारीत आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, काजोल आता न्यासाला एकटीला सिंगापूरला पाठवणार नाही. ठराविक काळासाठी ती आता मुलगी न्यासा सोबत राहणार आहे. याशिवाय त्यांचा मुलगा युग हा त्यांच्याजवळच म्हणजेच अजय जवळच मुंबईत राहणार आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, न्यासा सिंगापूरच्या युनायटेड वर्ल्ड ऑफ कॉलेज साऊथ ईस्ट एशियात शिकत आहे. 2018 मध्ये अजयनं सिंगापूरमध्ये फ्लॅटदेखील खरेदी केला आहे. आता काजोल आणि न्यासा त्यातच राहणार आहेत. अजय सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिजी आहे. त्यामुळं तो मुंबईतच थांबणार आहे.
न्यासा देखील आपल्या फोटोंमुळं किंवा कधी कुठे स्पॉट झाल्यानंतर चर्चेत येत असते. तिचे अनेक फोटो आजवर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. न्यासा तशी तर सिंगापूरमध्ये असते. आपल्या आई बाबांना भेटायला ती मुंबईत येत असते.