बहुजननामा ऑनलाइन टीम – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अॅक्ट्रेस काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) हिनं 30 ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलू (Gautam Kitchlu)सोबत लग्न केलं. लग्नाला 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर काजलनं हनिमूनसाठी पतीसोबत मालदीव गाठलं आहे. सध्या काजल मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे. काजलनं हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
काजलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती हनिमूनचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांची बेडरूम अंडरवॉटर आहे. फोटोत ती याच रूममध्ये दिसत आहे.
पाण्याच्या आत बनवलेली ही रूम दिसायला खूप सुंदर दिसत आहे. काजलच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती फोटोत ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे.
फोटोत काजल आणि गौतम यांच्या रोमँटिक अंदाजही दिसत आहे. सध्या काजलचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या लवकरच ती इंडियन 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती सुपरस्टार कमल हासनसोबत दिसणार आहे. एस. शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. तिच्याकडे साऊथचे दोन सिनेमे आहेत. याशिवाय काजल मुंबई सागा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.