बहुजननामा ऑनलाइन टीम – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अॅक्ट्रेस काजल अग्रवाल (Kajal Agarwal ) हिनं 30 ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलू सोबत लग्न केलं. लग्नाला 9 दिवस पर्ण झाल्यानंतर काजलनं(Kajal Agarwal ) हनिमूनसाठी पतीसोबत मालदीव गाठलं आहे.
काजलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. पती गौमत सोबत ती रोमँटिक अंदाजात एन्जॉय करताना दिसत आहे. दोघंही खूप आनंदात दिसत आहेत. काजल खूपच बोल्ड आणि क्युट अंदाजात दिसत आहे.
काजलचे हे रोमँटिक फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. अनेक चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करत यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काजलचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. कोणी तुला हॉट म्हणत आहे तर कोणी तिला ब्यूटिफुल आणि क्युट म्हणत आहे. तिची स्माईल चाहत्यांना विशेष आवडली आहे.
काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या लवकरच ती इंडियन 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती सुपरस्टार कमल हासनसोबत दिसणार आहे. एस शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. तिच्याकडे साऊथचे दोन सिनेमे आहेत. याशिवाय काजल मुंबई सागा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CHU8-v9nxiR/