भोकर शहरात अवैध गुटख्याची कार्यवाही कधी?जनतेतून चर्चा
अर्धापुर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही सर्रासपणे गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री केली जात आहे़ शेजारील राज्यांतून दररोज नांदेडात गुटख्याची आयात करण्यात येते़ अन्न व औषध प्रशासन, पोलिसांकडून त्यांच्यावर धाडीही घालण्यात येतात़ परंतु गुटखा विक्री व्यवसायावर आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नाही.शासना कडून बंद(प्रतिबंद) असलेल्या गुटख्याची नांदेड मध्ये सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून १ लाख ७५ हजार रुपये गुटखा पकडला़ यावेळी आरोपीने मात्र पलायन केले़ याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़ अन्न व औषध प्रशासन अधिकारी वर्ग नांदेड जिल्ह्यासाठी कमी असल्याने गुटखा व्यापाऱ्यांची चांदी होत आहे ते कुठल्याही कार्यवाही ला घाबरत नाही.
भोकर,मुदखेड,हिमायतनगर ह्या भागात गुटखा भोकर शहराच्या रेल्वे स्टेशन,समता नगर मधून गुटखा अनेक तालुक्यात पार्सल होतो प्रशासनास याची भन्नक लागली असून देखील त्यांच्या वर कार्यवाही होत नसल्याने भोकर शहरात सुद्धा कार्यवाहीची अति आवश्यकता आहे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे जात असताना ,प्रत्येक पान ठेल्यावर गुटखा मिळतो तरी औषध प्रशासन तळ ठोकून कार्यवाही केल्यास एक देखील गुटखा विक्रेते दिसणार नाहीत पण कार्यवाही करणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत अशी चर्चा भोकर शहरात सुद्धा सुरू आहे.समता नगर गुटखा विक्री सकाळी सहा पासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत असते तरी प्रशासन ह्या वेळेत कार्यवाही केल्यास पार्सल होणारा गुटखा भोकर शहरात पूर्ण पणे बंद होण्यास मदत होते या वेळेकडे प्रशासन लक्ष देणे अत्यावश्यक आहे.अर्धापुर भागात कार्यवाही झाली आता भोकर कडे कार्यवाही करणार का ह्या कडे भोकरच्या नागरिकांचे लक्ष वेधले आहे